पोस्ट्स

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नव्याने जारी केलेला अध्यादेश

इमेज
Maratha Reservation : नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा अध्यादेश काय सांगतो? वाचा सविस्तर   महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नव्याने जारी केलेला अध्यादेश खालीलप्रमाणे आहे. नियमांचा मसुदा 1. या नियमांस, महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, 2024 असे म्हणावे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी 26, 2024/माघ 6, शके 1945 2. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 याच्या नियम 2 व्याख्या मधील उप-नियम (1) मधील खंड (ज) नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल. ( ज) (1) सगेसोयरे : सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार

अर्थसंकल्पात ‘होम लोन’ची सूट वाढणार का? सूट मिळाली तर असा होणार फायदा

इमेज
  अर्थसंकल्पात ‘होम लोन’ची सूट वाढणार का? सूट मिळाली तर असा होणार फायदा.. Budget 2024 | सध्या होम लोनवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सूट दिली जाते. यामध्ये स्टँप शुल्क आणि नोंदणी शुल्क घेता येते. होमलोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते. परंतु तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर तुम्हाला या सूटचा फायदा घेता येत नाही. नवी दिल्ली,   केंद्रीय अर्थमंत्रालयात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरु आहे. मोदी 2.0 सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी त्यातून अपेक्षा खूप आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यात मध्यमवर्गींसाठी महत्वाची तरतूद असण्याची शक्यता आहे. गृहकर्जातून सूट वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. गृहकर्जाच्या निर्णयामुळे सामान्य मतदार आणि रिअल इस्टेट दोघांना बुस्ट मिळणार आहे. क्रेडाईकडून केली गेली मागणी कन्फेडरेशन ऑफ रिअल एस्टेट डेवलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) कडून होमलोन संदर्भात महत्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या होमलोनच्या व्य

बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

इमेज
  माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या.. बीड : तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली. हीच लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाईमाजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील लिपीक वैभव जाधव व अशपाक शेख या दोघांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना बुधवारी पकडले होते. यातही माजलगावच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यापाठोपाठ गुरूवारी लगेच बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे व खासगी इसमास पकडण्यात आले. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख