पोस्ट्स

Beed लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

इमेज
  माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या.. बीड : तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली. हीच लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाईमाजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील लिपीक वैभव जाधव व अशपाक शेख या दोघांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना बुधवारी पकडले होते. यातही माजलगावच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यापाठोपाठ गुरूवारी लगेच बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे व खासगी इसमास पकडण्यात आले. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५...